मुंबई : एनसीबीने पुन्हा एकदा बॉलिवूडकडे लक्ष वळवलं आहे. आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी एनसीबीने छापा मारला आहे. लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्रीच्या नावामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडची नकारात्मक छाप जगासमोर आली आहे. नुकतंच आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. मंगळवारी 26 ऑक्टोबर रोजी हायकोर्टात जामीनावर सुनावणी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता चंकी पांडेच्या मुलीची अनन्या पांडेची चौकशी होणार आहे. अनन्या पांडेची लवकरच चौकशी होणार असल्याचं सुत्र म्हणत आहेत. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी एनसीबीने धाड मारली आहे. व्ही व्ही सिंह यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने धाड मारली आहे. व्ही व्ही सिंह हे एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला दुपारी 2 वाजता एनसीबीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं आहे.
आर्यन खान प्रकरणाशी हा नवी एनसीबीची धाड असल्याच म्हटलं जात आहे. आर्यन खानच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या चॅटमध्ये या अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख असल्याच म्हटलं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडकडे एनसीबीची करडी नजर असल्याचं म्हटलं जात आहे.